How to fill HSC marks on online portal of HSC board.
HSC परीक्षेचे मार्क्स बोर्डाने दिलेल्या पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने कसे भरायचे या विषयी सविस्तर वाचा .
Hsc परीक्षेचे मार्क्स ऑनलाईन सादर करताना आपल्याकडे खालील प्रपत्रे असणे आवक्श्यक आहे .
१. विषयानुसार शिक्षकाने तयार केलेली विषयनिहाय गुनतक्ते ( J १.०१ वा इतर )
२. संकलित निकाल तक्ता (J .R १.०३)
(शिक्षकाने तयार केलेल्या विषयनिहाय गुणतक्त्याच्या आधारे संकलित निकाल तक्ता तयार करावा याचा फायदा विद्यार्थ्यांचे मार्क्स पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने टाकण्यास सोईचे होते.)
ऑनलाईन पद्धतीने मार्क्स भरण्यासाठी करावयाची कार्यवाही .
१. बोर्डाने आपल्याला लिंक उपलब्ध करून दिली आहे त्या लिंक वरून पोर्टल वर जा.
click here to fill online online hsc marks
२. आपल्या हाताच्या डाव्या कोपऱ्यात लॉगिन नावाची टॅब दिसेल त्या टॅब वर क्लिक करा.
३. आपल्या समोर लॉगिन चे पागे खुले होईल.
४. लॉगिन च्या पेजवर युसरनेम (उदा . J०५०००००_१) आणि पासवर्ड टाका नंतर दिलेले अल्फाबेट (CAPCHA CODE ) जसे त्या तसे टाकून लॉगिन करा.
५. आपल्या समोर मार्क्स भरण्याचे पेज खुले होईल.
६. या नंतर सर्वप्रथम रेगुलर विद्यार्थ्यांचे मार्क्स भरण्या करीत Regular या टॅब वर क्लिक करा.
७. आपल्या समोर परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व रेगुलर विद्यार्थ्यांची यादी दिसेल.
८. विद्यार्थांच्या नावा समोर असलेले FILL MARKS या टॅब ला क्लिक करा.
९. या नंतर विद्यार्थ्यांचे विषयानुसार मार्क्स भरण्याचे पेज खुले होईल.
१०. सर्व प्रथम विद्यार्थ्यांचा नाव , रोल नं , आणि विषय बरोबर असल्याची खात्री करा.
११. त्या नंतर वर्ग १० वि चे , वर्ग ११ व वर्ग १२ वि चे भारांशानुसार आलेले मार्क्स टाकावेत.(उदा. भारांश २४ पैकी किंवा २१ पैकी मिळालेले मार्क्स ) त्या नंतर oral किंवा practical चे मार्क्स टाकावे. येणारया मार्क्स चे एकूण टोटल हे ऑटोमॅटिक येणार ते आपल्या विषयानुसार केलेल्या विषयनिहाय गुणतक्त्याच्या आधारे तपासावे .
१२. या पद्धतीने इतर विषयाचे मार्क्स भरावे.
१३. Health and physical education आणि Environment Education या विषयाचे ग्रेड टाकून झाल्यानंतर SUBMIT या टॅब वर क्लिक करा.
१४. अश्या पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांचे मार्क्स भरावेत .
१५. REPORT या टॅब वरून रिपोर्ट डाउनलोड करून ती विषयनिहाय तक्त्यानुसार बरोबर असल्याची खात्री करावी . बदल असल्यास EDIT MARKS या टॅब वरून बदल करावा.
१६. पूर्ण खात्री झाल्यानंतरच प्रत्येक विद्यार्थांचे result एका पाठोपाठ confirm करावे.
Repeater Students ऑनलाईन चे मार्क्स भरणे.
१. Home page ला जा. Select candidate types मधुन Repeater या टॅब वर क्लिक करा.
२. Repeater म्हणून प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आपल्या समोर दिसेल.
३.विद्यार्थांच्या नावा समोर असलेले FILL MARKS या टॅब ला क्लिक करा.
४. या पूर्वी पास झालेल्या विषयाचे वर्ष ,महिना सीट नं , लेखी परीक्षेचे एकूण गुण(80/70 पैकी ) व लेखी परीक्षेत प्राप्त गुण टाकावेत. (विद्यार्थ्यांचे लेखी परीक्षेतील मार्क्स प्राप्त करण्या करीत बोर्डाने दिलेल्या संकलित गुणतक्त्याचा आधार घ्यावा )
५. आत्ता प्रविष्ठ होत असलेल्या विषयासमोर १० वी चे भारांशानुसार (४० पैकी ) प्राप्त गुण टाकावेत .त्या नंतर oral किंवा प्रॅक्टिकल चे गुण टाकावेत.
६. Health and physical education आणि Environment Education या विषयाचे ग्रेड टाकून झाल्यानंतर शेवटी SUBMIT या टॅब वर क्लिक करावा.
महत्त्वाचे :
REPEATERS विद्यार्थ्यांचे त्यांनी दिलेल्या सर्व परीक्षा चे गुणपत्रकाचा xerox copy सोबत त्या वर्षाची बोर्डाने दिलेली संकलित तक्त्याचे xerox copy जोडणे गरजेचे आहे. बोर्डाने त्या त्या वर्षी पुरवलेल्या संकलित तक्त्याच्या आधारे REPEATER विद्यार्थांचे लेखी परीक्षेचे गुण ग्राह्य धरावे
No comments:
Post a Comment