How to fill HSC board Exam Result proforma J1.01, J1.02, J1.03 and others

HSC गुण  तक्ते  एक्सेल शीट  नुसार भरण्या अगोदर काय करावे हे खालील लिंक वरून वाचा. 

वर्ग १०, ११, व १२ वि चे मार्क्स भरण्या विषयी.


सर्व प्रथम वर्ग १२ ला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे  वर्ग १० चे १०० पैकी गुण , वर्ग ११ वि चे १०० पैकी गुण तसेच वर्ग १२ वि चे घेतलेल्या लेखी परीक्षा चे एकूण गुण  व तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण  एकत्र संकलित करून ठेवावे .

मार्क संकलित करण्यासाठी एक्सेल शीट  खालील लिंक वरून डाउनलोड करा.

एकत्रित संकलित गुण तक्ता

वर्ग १२ वि च्या निकालाकरिता बोर्डाने आपल्याला एक्सेल शीट  उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

खालील लिंक वरून ते डाउनलोड करा. 

संकलित परिशिष्ठे J १.०१ ते इतर


Regular  _Final - Excel  या नावाची फाईल असेल.

DO NOT CHANGE THE FILE NAME OF EXCEL SHEET TILL WORK COMPLETE.

फाईल डाउनलोड केल्या नंतर ती ओपन करावी. (फाईल ओपन होण्यास उशीर होऊ शकते .)

Enable editing या टॅब वर क्लिक करा.

enable editing केल्या शिवाय excel sheet मध्ये formule active होणार नाही.


सर्वप्रथम भाषा विषयाचे मार्क भरण्याकरिता J १.०१ हि शीट  उपलब्ध आहे.

कला शाखा  शास्त्र विषयासाठी (८० + २०) विषयाचे मार्क भरण्याकरिता J १.०२  हि शीट  उपलब्ध आहे.

विज्ञान  शास्त्र विषयासाठी (७० + ३०) विषयाचे मार्क भरण्याकरिता J १.०३  हि शीट  उपलब्ध आहे.



कॉलम  क्र  १ मध्ये अनुक्रमांक टाकावे.

कॉलम  क्र  २ मध्ये विद्यार्थ्यांचा  १२ वि बोर्ड रोल नं  टाकावे.(बोर्ड ने दिलेल्या रोल नं च्या क्रमानुसार.)

कॉलम  क्र ३ मध्ये विद्यार्थ्यांचे नाव टाकावे.

(१२ वि बोर्ड चे आवेदन पत्र  भरण्याच्या साईट वरून कॉलेज लॉगिन केल्यास विद्यार्थ्यांचे रोल नं  तसेच नाव  प्राप्त होतात )

कॉलम  क्र ४ मध्ये वर्ग १० वि चे १०० पैकी प्राप्त गुण  टाकावे.

कॉलम  क्र ५ मध्ये भारांशानुसार वर्ग १० वि चे मार्क ऑटोमॅटिक कन्व्हर्ट होतात.

कॉलम  क्र ६ मध्ये वर्ग ११ वि चे वार्षिक निकालातील १०० पैकी चे गुण  टाकावेत.

कॉलम  क्र ७  मध्ये भारांशानुसार वर्ग ११ वि चे  मार्क ऑटोमॅटिक कन्व्हर्ट होतात.

कॉलम  क्र ८ मध्ये वर्ग १२ वि साठी लेखी गुणांचे किती मार्कचे पेपर घेतले ते मार्क टाकावेत.

कॉलम  क्र ९  मध्ये वर्ग १२ वि साठी घेतलेल्या एकूण लेखी गुणांपैकी किती मार्क प्राप्त झाले ते टाकावेत.

कॉलम  क्र १०  मध्ये वर्ग १२ वि चे  भारांशानुसार मार्क ऑटोमॅटिक कन्व्हर्ट होतात.

कॉलम  क्र ११  मध्ये ८० पैकी लेखी परीक्षेचे प्राप्त एकूण गुण दिसतात.

कॉलम  क्र १२  मध्ये अंतिम परीक्षेचे तोंडी / प्रात्यक्षिक चे गुण टाकावेत.(गुण  ऑटोमॅटिक येताना दिसतील मात्र आपल्या जवळ असलेल्या गुणांप्रमाणे बदल करावा. )

कॉलम  क्र १३ मध्ये  आपणास विद्यार्थ्यांचा त्या विषयातील वर्ग १२ वि साठीची एकूण संपादणूक  (मार्क ) ऑटोमॅटिक  होतात दिसतील. 


सदर  एक्सेल शीट  ची प्रिंट काढून online work  करण्याकरिता  जवळ ठेवावी.
 (प्रिंट करण्याकरिता  एक्सेल मध्ये page  layout मधून  A४ size पेपर landscape  मध्ये सिलेक्ट करून narrow  margin  घ्यावी. column  ची लांबी कमी करावी.)

लक्ष्यात ठेवायच्या बाबी.

१. बोर्ड ने दिलेल्या साईट वरूनच एक्सेल फाईल डाउनलोड करावी.
२. मध्ये सूत्र अगोदरच  टाकलेले आहेत त्यामुळे column  no ५, ७, १०, ११ व १३ मध्ये स्वतः कोणतेही मार्क्स भरू नये 
३. शिक्षकाला फक्त column  no . १ ते ४, ६, ८, ९ व १२ मध्येच गुणांची नोंद करायची आहे. 

खालील व्हिडिओ  क्लिप पहावी.









No comments:

Post a Comment

XII STD Poetic Appreciation

 POETIC APPRECIATION : BOARD ACTIVITY : QUE:3 B (4 MARKS) Que. no 3 B is compulsory activity. This is simplified appreciation of entire poem...