इ. ११ वी प्रवेशासाठीच्या शासनाकडून घेण्यात येणाऱ्या CET परीक्षेबाबतची अत्यंत महत्वाची माहिती!
शैक्षणिक वर्ष सन २०२१-२२ साठी इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा CET घेण्यात येणार आहे.
दि. २० जुलै २०२१ पासून सकाळी ११.३० वा पासून या परीक्षेची आवेदनपत्रे भरण्यात येतील.
CET EXAM FORM भरण्याकरिता इथे क्लिक करा.
फॉर्म भरण्यास कुठलीही फी लागणार नाही
लक्षात असू द्या इय्यता १०वि तील विद्यार्थांनी अगोदरच बोर्डची फी भरली असल्यामुळे हि परीक्षा निशुल्क आहे.
परीक्षा देणे विद्यार्थांसाठी बंधनकारक नाही मात्र परीक्षा देणार्यांना ११ वि प्रवेशासाठी प्रथम प्राध्यान्य असेल.
इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam) दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. म्हणजेच इ. ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam) दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल.
सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam) दिलेल्या विद्यार्थ्याच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या उर्वरित जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam) दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam) न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वीच्या मुल्यमापन पध्दतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतील.
अकरावीच्या प्रवेशासाठी CET म्हणजे सामायिक प्रवेश परीक्षा हि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्यात घेतली जाईल.
परीक्षेचे स्वरूप
ही परीक्षा Offline पद्धतीने होणार आहे.
पोर्टल वर क्लिक केल्यावर विद्यार्थ्यांना आपला बोर्डाचा बैठक क्रमांक भरावा लागेल.
विद्यार्थाना परीक्षा द्यायची की नाही असे दोन पर्याय दिले जातील.
त्यातील योग्य पर्याय निवडून फॉर्म भरावयाचा आहे.
इ. ११ वी प्रवेशासाठी असलेल्या CET परीक्षेचे स्वरुप
१. CET परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका / पेपर असेल.
२. परीक्षेचा कालावधी दोन तास राहील.
३. इंग्रजी, गणित, विज्ञान व समाजिक शास्त्र या विषयावर प्रत्येकी 25 प्रश्न विचारले जातील.
४. परीक्षा ऑफलाईन घेण्यात येईल.
५. प्रश्न पत्रिकेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे (Multiple Choice Objective Type Questions) असेल.
६. परीक्षा O.M.R. sheet वर आधारीत असेल.
लक्षात असू द्या इय्यता १०वि तीळ विद्यार्थांनी अगोदरच बोर्डची फी भरली असल्यामुळे हि परीक्षा निशुल्क आहे. परीक्षा देणे विद्यार्थांसाठी बंधनकारक नाही मात्र परीक्षा देणार्यांनाच ११ वि प्रवेशासाठी प्रथम प्राध्यान्य असेल.
Hey Nice Blog!!! Thank you for sharing information. Wonderful blog & good post.Its really helpful for me, waiting for a more new post. Keep Blogging!!!
ReplyDeleteSpecial School and Care Home in Lucknow
Day Boarding Near me