व्हिक्टर ह्युगोची मूळ कविता
*The Sower* सध्याच्या अकरावीच्या अभ्यासक्रमात आहे,
त्याचा मराठी भावानुवाद 😊


मावळतीला लालिमा बघत
मी अंगणात निवांत बसून आहे,
समोरच्या शेतात
पसरलेला संधिप्रकाश -
काम थांबवण्याचा इशारा देतो आहे ...

सगळीकडे झाडामाडांच्या
मोठ्या होत जाणाऱ्या सावल्या-
आणि एक पेरणी करणारा
वृद्ध, फाटका तरीही -
मन लावून पेरणी करणारा
मी पाहातचं बसलो आहे ...

आणखी कललेला सूर्य
नांगरलेल्या रेषांमधून -
त्याची ठाशीव आकृती
रेखीव करतो आहे-
तो आज पेरत आहे
जे उद्या उगवणार आहे ...

दमदार पावलांनी तो
एकेक वाफा पेरत आहे -
आपल्या शेतात
मुठी भरभरून सोनं पेरणारा
तो आणि त्याचा सोनं
उगवण्याचा आत्मविश्वास -
मला इथे बसून जाणवतोय ...

सूर्यास्त झाल्याने अंधार वाढतो आहे
अंधुक माझ्या नजरेला
तरीही स्पष्ट दिसते आहे -
त्याचे उदात्त काम आणि
उंच वाकलेला तो
चांदण्या आभाळालाही
तो टेकलेला आहे...

*#नीलिमा_देशपांडे*

मूळ कविता

Sitting in a porchway cool,
Fades the ruddy sunlight fast,
Twilight hastens on to rule--
Working hours are wellnigh past

Shadows shoot across the lands;
But one sower lingers still,
Old, in rags, he patient stands,--
Looking on, I feel a thrill.

Black and high his silhouette
Dominates the furrows deep!
Now to sow the task is set,
Soon shall come a time to reap.

Marches he along the plain,
To and fro, and scatters wide
From his hands the precious grain;
Moody, I, to see him stride.

Darkness deepens. Gone the light.
Now his gestures to mine eyes
Are august; and strange--his height
Seems to touch the starry skies

No comments:

Post a Comment

XII STD Poetic Appreciation

 POETIC APPRECIATION : BOARD ACTIVITY : QUE:3 B (4 MARKS) Que. no 3 B is compulsory activity. This is simplified appreciation of entire poem...